Breaking

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

कराड मधील बापूजी साळुंखे महाविद्यालयात वेबिनार; भारताचे अर्थचक्र सक्षम करण्यासाठी तरुणांना रोजगाराची हमी दिली पाहिजे : अर्थतज्ज्ञ डॉ.अनिलकुमार वावरे


वेबिनार मधील मान्यवर व्यक्ती

प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक


कराड : शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय,कराड अर्थशास्त्र विभाग व शिवाजी युनिव्हर्सिटी इकाॅनॉमिक्स असोसिएशन कोल्हापूर अर्थात सुयेक यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित "भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास" या विषयावरील नॅशनल वेबिनारमध्ये प्रमुख पाहुणे स्वामी विवेकानंद संस्थेचे सचिव व प्राचार्य प्रा.सौ.शुभांगी गावडे या होत्या. बीजभाषक म्हणून सुयेकचे अध्यक्ष व अर्थतज्ज्ञ डॉ.अनिलकुमार वावरे,वेबिनारचे साधन व्यक्ती म्हणून प्रा.प्रविण जाधव व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्र.प्राचार्य डॉ. सतिश घाटगे हे उपस्थित होते.

       वेबिनारच्या सुरुवातीस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांनी या वेबिनारसाठी मनस्वी शुभेच्छा दिल्या.  

     अर्थतज्ज्ञ प्रो.डॉ.अनिलकुमार वावरे मौलिक मार्गदर्शन करताना म्हणाले, स्वतंत्र भारताच्या आर्थिक विकासासाठी पंचवार्षिक योजना अंमलात आणल्या गेल्या. अन्नधान्य स्वयंपूर्णतेसाठी हरितक्रांती घडवून आणली गेली.१४ मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले. १९४७ पासून ते  आज तागायत भारतीय अर्थव्यवस्थेने अनेक चढउतार पाहिले आहेत. वाढत्या विकासाबरोबर लोकसंख्याही वाढली आणि स्वातंत्र्याच्या  ७४ वर्षांनंतर देखील दारिद्र्य, बेरोजगारी व अन्य महत्वाचे बिकट प्रश्न भेडसावत आहेत.सन १९९१ च्या आर्थिक सुधारणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी मिळाली आहे. विदेशी व्यापारात वाढ झाली असून पायाभूत सुविधा वाढलेल्या आहेत. भारताच्या आर्थिक विकासाला गती प्राप्त करून देण्यासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. अत्यंत महत्त्वाच्या या विषयावर राष्ट्रीय वेबिनार आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयास त्यांनी शुभेच्छा दिल्या.

            वेबिनारचे प्रमुख साधन व्यक्ती आय.आय.टी.आर.एम. ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी गुजरातचे डॉ. प्रविण जाधव होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, १९९१ च्या अगोदर देशात परकीय चलनाचा साठा खूप कमी होता. सद्यपरिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी प्रगती होत आहे. आत्मनिर्भर भारत अभियानामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. आपल्या देशात शेतमालाच्या गोदामा सारख्या सुविधांची कमतरता आहे. भारतामध्ये ज्या क्षेत्रात विदेशी गुंतवणूक कमी आहे त्या क्षेत्रात ती वाढवली पाहिजे. सरकारच्या प्रत्येक योजनेची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. भारतात मोठ्या प्रमाणात युवाशक्ती आहे. औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असणारे कौशल्य युवकांच्या मध्ये निर्माण केले तर नक्कीच बेरोजगारीत घट होईल. या वेबिनारच्या निमित्ताने मी सर्वांना धन्यवाद देतो.

   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, अत्यंत कष्टातून त्यागातून स्वातंत्र्यवीरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पासून ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यामुळे आपले विकसनशील असलेले राष्ट्र विकासाच्या दृष्टीने पावले टाकत आहे. त्यासाठी देशातील युवकांना कौशल्यप्रदान करून अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशातील युवा शक्तीचा वापर अर्थव्यवस्था विकसित होण्यासाठी व्हावा हा प्रमुख उद्देश या वेबिनारचा आहे. 

            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख व वेबिनारचे समन्वयक डॉ.मारुती सूर्यवंशी यांनी केले. वेबिनार उद्घाटन सोहळ्याचे आभार प्रा. आर. एम. कांबळे यांनी व्यक्त केले. बीजभाषक मार्गदर्शनाचे प्रास्ताविक प्रा. रत्नाकर कोळी यांनी केले तर आभार डॉ. संजय चव्हाण यांनी व्यक्त केले. सत्र 2 चे अध्यक्ष डॉ. ए. के. पाटील होते. प्रास्ताविक डॉ. कैलास पाटील यांनी केले तर आभार डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे मंत्रमुग्ध करणारे सूत्रसंचालन प्रा.सौ.टी.एम.अत्तार यांनी केले. 

      या वेबिनारसाठी प्रा.सचिन बोलाईकर व प्रा.रत्नाकर कोळी यांनी तांत्रिक सहाय्य  केले. या वेबिनार साठी देशातील विविध राज्यातील, विविध विद्यापीठातील व महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी व अन्य घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोना नियमांचे पालन करून वेबिनार संपन्न झाला.

       एकूणच या वेबिनारच्या आयोजन व विषयाबाबत सहभागी घटकाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा