![]() |
ध्वजारोहण करताना संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, सन्माननीय संचालक,प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व प्राचार्य प्रिया गारोळे व उपस्थितांना मार्गदर्शन करताना केंद्रप्रमुख मेघन देसाई |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज मध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीच्या घोषणांनी, कवायती सादरीकरण व स्फूर्तीदायक पथसंंचालनाच्या माध्यमातून आनंदमय वातावरणात संपन्न झाला. संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला.
याप्रसंगी जयसिंगपूर नगरपरिषद शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख मेघन देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, स्वातंत्र्य हे आपल्या पूर्वजांच्या रक्ताने सिंचित झालेले पवित्र ऋण आहे, जे आपण कर्तव्याने फेडले पाहिजे. मातृभूमीच्या सन्मानासाठी प्रत्येक क्षण देशसेवेत अर्पण करणे हीच खरी देशभक्ती आहे. राष्ट्रप्रेम हीच आपली खरी ओळख असून कर्तव्यनिष्ठा हा त्याचा श्वास आहे. आपण एकत्र राहिलो तर स्वातंत्र्याची पताका सदैव अभिमानाने फडकत राहील. त्यांनी स्वातंत्र्याचा व कर्तव्य तत्परता व राष्ट्रसेवेचे महत्त्व पटवून दिले.
प्राचार्य डॉ. सुरत मांजरे,प्राचार्या प्रिया गारोळे व एन.एस.एस.चे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली.
याप्रसंगी संस्थेचे खजिनदार पद्माकर पाटील,सर्व सन्माननीय संचालक,अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मॅनेजर अभिजीत अडदंडे, एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. सुशांत पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर उपस्थित होते.उपप्राचार्य प्रा. भारत आलदर, पर्यवेक्षक डॉ.महावीर बुरसे, सर्व विद्या शाखेचे प्रमुख,कॉलेजचे सर्व प्राध्यापकवृंद, कार्यालयीन अधीक्षक संजय चावरे, इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा शिक्षकवर्ग, प्रशासकीय कर्मचारी सेवक, स्काऊट अँड गाईड, एनसीसी कॅडेट्स व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी. ए. पाटील यांनी केले.
कार्यक्रमानंतर दरवर्षीप्रमाणे अनेकांत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने उपस्थितांना मोफत जिलबी वाटप करण्यात आले याप्रसंगी पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रा पी.सी.पाटील, मॅनेजर राहुल पाटील व सुधाकर पाटील उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा