Breaking

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४

उदगाव- अंकली पुलावरून थेट चार चाकी गाडी कृष्णा नदीत : तीन जण जागीच ठार व इतर जखमी

 

उदगाव - अंकली कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून अपघात


*मालोजीराव माने : कार्यकारी संपादक*


जयसिंगपूर :  जयसिंगपूर - सांगली महामार्गावर असलेल्या (अंकली-उदगाव) कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून चारचाकी कोसळल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घटना घडली असल्याची माहिती समोर आली. या अपघातात सांगलीचे पती-पत्नीसह तिघेजण जागीच ठार झाले. पती प्रसाद भालचंद्र खेडेकर (वय ३५) व पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर (वय ३६) दोघे रा. मारुती रोड गाव भाग सांगली, व वैष्णवी संतोष नार्वेकर (वय २१ रा. आकाशवाणी केंद्र जवळ सांगली) अशी त्यांची नावे आहेत.

     या घटनेत समरजीत प्रसाद खेडेकर (वय ७), वरद संतोष नार्वेकर (वय १९) व साक्षी संतोष नार्वेकर (वय ४२) सर्व रा. सांगली हे गंभीर जखमी झाले आहेत. 

   घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलीसांनी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व मृतदेह बाहेर काढण्यात आले. यापूर्वी याच ठिकाणी  तीन ते चार वेळा असे दुर्दैवी अपघात झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा