![]() |
मयत अविनाश कामगोंडा पाटील, निमशिरगाव |
*प्रा.डॉ.प्रभाकर माने :मुख्य संपादक*
जयसिंगपूर : निमशिरगाव ( ता. शिरोळ) येथील मयत अविनाश कामगोंडा पाटील ( वय वर्ष 32) या तरुणाचा तमदलगे डोंगराच्या पायथ्याशी दगडाने ठेचून खून केल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे.
या घटनेनंतर निमशिरगाव व तमदलगेमध्ये एकच खळबळ माजली आहे. माहिती मिळताच घटनास्थळी जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने धाव घेतली आहे.मात्र हा खून कोणत्या कारणास्तव झाला आहे हे अद्यापही समजू शकले नाही.
सदरची घटना सोमवारी रात्री घडली असल्याचे दिसून आले आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के घटनास्थळी दाखल झाले असून पंचनाम्याचे काम सुरू आहे. या खुन्याच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा