Breaking

शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५

*अनेकांत मध्ये कॉमर्स विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी ट्रेड फेअरचे आयोजन*


अनेकांत इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर


*प्रा. ज्योती पोरे : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर :  येथील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या कॉमर्स विभागातर्फे शाळेतील व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी दि.५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते २ या वेळेमध्ये भव्य अशा ट्रेड फेअरचे आयोजन शाळेच्या प्रशस्त प्रांगणामध्ये  केलेले आहे.


      यामध्ये खाद्यपदार्थ, कपडे, दागिने,फळे व भाज्या तसेच लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी असे विविध भव्य स्टॉलची उभारणी  केली जाणार आहे. सर्व पालक व नागरिकांना या शालेय पातळीवरील अनोख्या ट्रेड फेअरला भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा असे आवाहन अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा कॉमर्स विभाग, प्राचार्य आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

      कॉमर्स विभागाचा हा ट्रेड फेअर अनोखा व व्यवहारवादी जगताशी जोडणारा नाविन्यपूर्ण उपक्रम असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा