Breaking

रविवार, १७ ऑगस्ट, २०२५

*शिवाजी विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा प्रा. (डॉ.) जे. एफ. पाटील स्मृती पुरस्कार डॉ. नरेंद्र जाधव यांना जाहीर*


शिवाजी विद्यापीठाचा मानाचा कालवश प्रा.डॉ.जे.एफ.पाटील स्मृति पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ञ व समाज शास्त्रज्ञ प्रा.डॉ. नरेंद्र जाधव यांना जाहीर

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठामार्फत दोन वर्षातून एकदा देण्यात येणारा प्रा. (डॉ.) जे. एफ. पाटील स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांना जाहीर करण्यात आलेला आहे. रोख रक्कम रु. ५१ हजार, मानपत्र, शाल व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. येत्या २० ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.अर्थशास्त्रात भरीव योगदान देणाऱ्या आंतरराष्ट्रीय तथा राष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम व्यक्ती अथवा संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो. सदर पुरस्कारासाठी शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशनने शिवाजी विद्यापीठाकडे एकत्रित निधी सुपूर्द केला आहे. पहिला पुरस्कार विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष प्रा. (डॉ.) सुखदेव थोरात यांना प्रदान करण्यात आला आहे.

        यंदा या पुरस्कारासाठी शिवाजी विद्यापीठाच्या शोध समितीने अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांची एकमताने निवड केली आहे. सदर शोध समितीचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के हे असून समितीमध्ये मानव्यविद्या शाखा अधिष्ठाता प्रा.डॉ. महादेव देशमुख, उपप्राचार्य प्रा. जे. ए. यादव, ज्येष्ठ अर्थतज्ञ  प्रा.डॉ. विजय ककडे आणि माजी सुयेक अध्यक्ष डॉ. राहुल शं. म्होपरे यांचा समावेश आहे. 

     पुरस्कार प्रदान समारंभाचे आयोजन शिवाजी विद्यापीठाचा अर्थशास्त्र अधिविभाग आणि शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन, कोल्हापूर अर्थात सुयेक यांनी संयुक्तरित्या केले आहे. अर्थशास्त्रासह शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती, अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मानव्य विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी केले आहे.


    *आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञ प्रा.डॉ. नरेंद्र दामोदर जाधव यांचे विषयी*

      डॉ. नरेंद्र जाधव हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, सार्वजनिक धोरणतज्ञ, उत्तम वक्ते, संवेदनशील व्यक्तिमत्व आणि उत्तम लेखक आहेत, ज्यांनी मराठी, इंग्रजी आणि हिंदीमध्ये उत्तम व अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे.


*डॉ. नरेंद्र जाधव यांची शैक्षणिक पार्श्वभूमी :*

१) बी.एस्सी. (संख्याशास्त्र व अर्थशास्त्र), मुंबई विद्यापीठ, 1973 

एम.ए. (अर्थशास्त्र), मुंबई विद्यापीठ, 1975 

२)पीएच.डी., अर्थशास्त्र, इंडियाना विद्यापीठ, अमेरिकेतील (Indiana University), 1986; त्यांनी “Best International Student” पुरस्कारही मिळवला .


*कुलगुरूपद – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ*

१) त्यांनी 2006 ते 2009 या काळात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सेवा केली .

महत्त्वपूर्ण सार्वजनिक भूमिका आणि धोरण क्षेत्रातील काम

*रिझर्व्ह बँकेतील कार्य*

        मुख्य अर्थतज्ज्ञ (Chief Economist) स्थितीत 2004 ते 2006 पर्यंत सेवाकाल

*आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य*

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मध्ये सल्लागार (Advisor), आणि अध्यक्षीय भूमिका होती.

*नियोजना संदर्भात कार्य*: 

पंतप्रधानांच्या नियोजन आयोगाचा सदस्य (Planning Commission), तसेच राष्ट्रीय सल्लागार मंडळ (National Advisory Council) सदस्य म्हणून योगदान आहे.


*राज्यसभा सदस्यत्व*

ते भारतीय संसदेत राज्यसभेत (Rajya Sabha) नामांकित सदस्य होते .

*लेखन आणि संशोधन*

 मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषांमध्ये त्यांनी ३० पेक्षा अधिक पुस्तके आणि ३०० शोधपेपर प्रकाशित केले आहेत. त्यांच्या लिखाणात विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रविंद्रनाथ टागोर यांचा समावेश आहे ."मी आणि माझा बाप" हे डॉ. नरेंद्र जाधव यांचे आत्मकथनात्मक व अत्यंत गाजलेले मराठी पुस्तक आहे.या पुस्तकात त्यांनी स्वतःचा आणि त्यांच्या वडिलांचा संघर्षमय प्रवास मांडला आहे. हेच पुस्तक पुढे इंग्रजीत “Outcaste – A Memoir” या नावाने प्रकाशित झाले.

*पुरस्कार आणि सन्मान*

त्यांच्या व्यावसायिक योगदानासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यात 

१) फ्रांस सरकारकडून “Commander of the Order of Academic Palms” हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे.

२) “Maharashtra Ratna” या या पुरस्काराने  सन्मानित झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा