Breaking

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

वुई केअर सोशल फौंडेशन'तर्फे मातोश्री वृद्धाश्रम, शिंगणापूर येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा




     दरवर्षी 10 ऑक्टोंबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त समाजामध्ये मानसिक आरोग्याविषयी जागृकता पसरवण्याचा व मानसिक आरोग्यासाठी आवश्यक ती मदत पोहचवण्यासाठी या दिवसाचे आयोजन केले जाते. आज मानसिक आरोग्याबद्दल लोक जागृक नसल्याचे दिसून येते व काही जणांच्या मते ही वाईट गोष्ट आहे. भारत देशात 4 पैकी 1 व्यक्ती ही डिप्रेशन चा शिकार होताना दिसत आहे म्हणजेच घरटी 1 व्यक्ती ही डिप्रेशन मध्ये आहे व ही चिंतेची बाब आहे.



आजी आजोबांसोबत गप्पा व मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अध्यात्मिक व मनोरंजनक्षेत्राशी संबंधित विविध खेळ घेऊन आज *वुई केअर सोशल फौंडेशन कडून मातोश्री वृद्धाश्रमातील आजी - आजोबांसोबत मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.*




 यावेळी वुई केअर सोशल फौंडेशनचे विश्वस्त इम्रान शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, सुदर्शन पांढरे यांनी मानसिक आरोग्याविषयी माहिती दिली, मनीषा धमोने यांनी आभार मानले. तर विश्वस्त सलमान मुजावर, अश्विनी पाटील, पूजा इंगवले यांचे सहकार्य लाभले. यावेळी गोखले कॉलेजच्या प्रोग्राम ऑफिसर डॉ. स्मिता गिरी उपस्थित होत्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा