संशयित गुन्हेगार व गुन्हे शाखा पथक |
प्रविणकुमार माने : उपसंपादक
जयसिंगपूर पोलीस ठाणे सदर गुन्हयातील फिर्यादी कु. मृदूला अनंत गडदे वय १८ वर्षे ४ महिने व्यवसाय शिक्षण रा.हेरवाडे कॉलनी, जयसिंगपूर ता. शिरोळ यांना यातील आरोपी क्रं. १ रेहान अस्लम हुसेन नदाफ रा. उदगाव याने पिडीत फिर्यादींशी ओळख वाढविली. दरम्यानच्या काळात तिचा फायदा घेवून पिडीत फिर्यादी यांना व त्यांचे आई वडीलांना ठार मारणेची धमकी देवून त्यांचेकडून फिर्यादीचे आईचे ३० ते ३१ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने देणेस भाग पाडले. त्यानंतर ते दागिने आरोपी क्रं. १ व ४ यांचे नावे ICICI बँक, शाखा, जयसिंगपूर येथे गहाण ठवले तसेच यातील आरोपी क्रं. रेहान नदाफ, अस्लम हुसेन नदाफ, दोघे रा.उदगाव, रियाज शमशुद्दीन राजापूरे रा.चिपरी व अनिकेत शिंदे यांनी सदरचे दागिने सोडवून देतो असे सांगून ते अद्याप सोडवून न देवुन फसवणूक केली. तसेच यातील आरोपी क्रं. १ याने आरोपी क्र. ५ ते ८ यांचे मदतीने फिर्यादी यांचेशी लग्न करणेच्या उद्देशाने त्यांना जयसिंगपूर येथून जबरदस्तीने मोटरसायकलवरून कुरूंदवाड येथे नेऊन तेथे लग्न केलेच्या कागदपत्रावर जबरदस्तीने सहया घेवून फिर्यादी यांची फसवणूक केलेबाबत फिर्यादीनी फिर्याद दिलेली आहे.
सदर घटनास्थळी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री रामेश्वर वैजने सो यांनी भेट देवून गुन्हयातील आरोपी शोध घेणेकामी मा. पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र मस्के साहेब, यांचे मार्गदर्शना खाली पोसई श्री प्रमोद वाघ, श्री अजित पाटील पो.कॉ. २१०८ असलम मुजावर, १३३३ रोहीत डावाळे, ८८५ संदेश शेटे, ८४३ जावेद पठाण यानां सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे यातील आरोपी नामे १] रेहान अस्लम हुसेन नदाफ वय २४ वर्षे, रा.उदगाव ता. शिरोळ, २] अनिकेत धनाजी शिंदे वय २५ वर्षे, रा. जयसिंगपूर, ता.शिरोळ, ३] साहील नजीर नदाफ वय २३ वर्षे, रा. उदगाव ता. शिरोळ, ४] शाहरूख अयुब जमादार वय २९ वर्षे, रा. दानोळी ता.शिरोळ यांना शिताफिने पाठलाग करुन दि. ०६/१०/२०२१ रोजी अटक करून मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो, न्यायालय जयसिंगपूर यांचे समोर हजर केले.
मा. कोटांनी त्यांना दि. ११/१०/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. त्यांचेकडे तपास करून यातील आरोपीत याचेकडून गुन्हयातील फसवणूक केलेले २३ तोळे ६५० मिली ग्रॉम वजनाचे सोन्याचे दागीने, तसेच सदर गुन्हयामध्ये यातील आरोपीने वापरलेल्या १] ११००००/- रुपये किंमतीची सुझुकी कंपाची जिक्सर मोटरसायकल तीचा रजि. नं. MH. १० CD.००७२ २] ५००००/-रु. किमतीची हीरो होंडा कंपनीची सी.डी. डिलक्स मोटरसायकल रजि. नं. MH-०९-BE-२९९७, ३६००००/- रु.किमतीची हीरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल रजि. नं. MH-०९-CG-३८७८ गुन्हयात वापरलेल्या अशा एकुण ०३ मोटरसायकली व २३ तोळे ६५० मिली सोने असा एकुण १३,७२,०००/- रुपये किमतीचा गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे. तसेच यातील आरोपीने फिर्यादी यांचे वडीलांना बँकेतुन ७ तोळे ७ ग्रॅम सोने परत दिलेले आहे. सदर गुन्हयातील सर्व ३१ तोळे सोन्याचे दागिने गुन्हयाचे तपास कामी जप्त करणेत आले आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे', मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड सो, व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रामेश्वर वेंजने सो यांचे मार्गदर्शनाखाली मा.पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र मस्के साहेब, यांचे मार्गदर्शना खाली पोसई श्री प्रमोद वाघ, श्री अजित पाटील पो.कॉ. २१०८ असलम मुजावर, १३३३ रोहीत डावाळे, ८८५ संदेश शेटे, ८४३ जावेद पठाण, यांनी केलेली आहे. सदर गुनहयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ हे करीत आहेत.
या घटनेने जयसिंगपूर शहर व परिसरात खळबळ माजली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा