Breaking

रविवार, ९ जानेवारी, २०२२

*संतापजनक ! हातकणंगले दर्गा चौक परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; संशयित आरोपीस केले जेरबंद*


हातकणंगले मध्ये एका अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार


*प्रविणकुमार माने : उपसंपादक*


हातकणंगले :  हातकणंगले ता. हातकणंगले दर्गा चौक परीसरात संशयित आरोपी नंदकुमार चंद्रकांत निगवे राहतो. मुलीच्या इच्छेविरुद्ध त्याने  तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार  समोर येत असून त्यातून त्या अल्पवयीन मुलीने एका स्त्री अर्भकास जन्म दिला असल्याचे समोर येत आहे.या घटनेने महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करणारी आणि सर्वांना सुन्न करून टाकणारी आणखी एक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडल्याने एकच खळबळ माजली आहे.

    सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , हातकणंगले तेथील संशयित आरोपी नंदकुमार चंद्रकांत निगवे वय वर्ष ६१ या इसमाने  अल्पवयीन मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार केला असून ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने हातकणंगले तालुक्यात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी संशयित आरोपी नंदकुमार चंद्रकांत निगवे याच्याविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हातकणंगले पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे.

      गजबजलेल्या हातकणंगले दर्गा चौक परीसरात नंदकुमार चंद्रकांत निगवे हा संशयित आरोपी राहतो. पिडीत मुलीच्या इच्छेविरुद्ध त्याने आपल्या नवीन बांधकामावरील पञ्याच्या शेडमध्ये मुलीला फसवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे. मात्र धक्कादायक बाब अशी की, पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने संशयित आरोपी नंदकुमार निगवेच्या वाईट कृत्याचा भांडाफोड झाला आहे. 

    सदर पीडीत मुलगी गर्भवती असल्याने सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरु होते त्यातून तिने स्ञी अर्भकाला जन्म दिला. त्यानंतर नातेवाईकांनी सांगली जिल्ह्यातील संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ती तक्रार हातकणंगले पोलीस ठाण्याकडे नुकतीच वर्ग करण्यात आली असून  न्यायालयाने सदर आरोपीस  पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

      हातकणंगले पोलीसांनी या घटनेची कसून तपास करीत असून चौकशीदरम्यान त्याच्या अन्य काळ्या कृत्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच्यावर कठोर कलमांतर्गत गुन्हे दाखल करून या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी केली जावी, अशी मागणी आता हातकणंगले शहर व परिसरातून तसेच पीडित मुलीच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.

     खाजगी सावकारीतून मिळविलेला काळापैसा या पैशांच्या जोरावर त्याने गैरकृत्य चालू ठेवले होते. त्याने खाजगी सावकारीतून अनेक अन्याय केल्याचे उघडकीस आले आहेत. त्याच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्याच्या अशा गैरवर्तणुकीचा समाजाला धोका असल्याचे ग्रामस्थांनी वारंवार पोलीस यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिलेले होते व याआधी संतप्त ग्रामस्थांनी त्याची धिंडही काढली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे आता त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्याची मागणी जोर धरत आहे.

      सदर मुलीला न्याय मिळावा व  त्याच्या या दृश्यकृत्याचा आणखी  पर्दापाश होऊन कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जनमानसातून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा