सम्राट कोराणे व संजय तेलनाडे |
*प्रविणकुमार माने : उपसंपादक*
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील मोका’ कायद्यान्वये कारवाई झालेला कोल्हापूरचा मटका बुकी सम्राट सुभाष कोराणे याच्या ₹ २९ कोटी मूल्याची आणि इचलकरंजी येथील दहशतीच्या माध्यमातून काळी माया जमा करणारे माजी नगरसेवक संजय व सुनील तेलनाडे बंधूंच्या ₹ १७ कोटी मूल्याच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सदर मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारास न्यायालयाने मनाई केल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शनिवारी प्रसार माध्यमाशी बोलताना दिली.
सदर मोका’ कायद्यातंर्गत मटका बुकी सम्राट कोराणे याच्यासह तेलनाडे बंधूंविरुद्ध अडीच वर्षांपूर्वी ‘ कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांविरोधात विशेष ‘मोका’ न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करूनही संशयित आरोपींना फरारी घोषित करण्यात आले होते. तसेच त्यांच्या स्थावर मालमत्तांच्या मूल्यांकनाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला होता, असेही बलकवडे यांनी सांगितले.
विशेष मोका न्यायालयाने दिलेल्या अहवालानुसार सम्राट कोराणे याची ₹२९ कोटी आणि तेलनाडे सरकार बंधूंची ₹१७ कोटीची मालमत्ता असल्याची माहिती प्राप्त झाली. विशेष ‘मोका’ न्यायालयात या मालमत्तांचा अहवाल सादर करण्यात आला. त्यावर या मालमत्तांची खरेदी अथवा विक्री करण्यास न्यायालयाने मनाई केल्याचे ते म्हणाले.
कोल्हापूर पोलिसांनी संजय तेलनाडे याला पुण्यातून अटक करून अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी योग्य दिशेने तपास सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली. न्यायालयानेही त्यावर समाधान व्यक्त केले आहे. फरारी काळातील त्याचे वास्तव्य आणि आर्थिक रसद पुरविणार्या व्यक्तींबाबत त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.
त्यानंतर संबंधितांवर कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले. फरारी असलेला कोराणे याचाही शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यालाही लवकरच जेरबंद करण्यात पथकांना यश येईल, असेही बलकवडे यांनी सांगितले.
सदरच्या प्राप्त झालेला माहितीने, बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा