![]() |
| जयसिंगपूर कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन साजरा |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : महाराष्ट्राच्या स्थापनेला ६४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जयसिंगपूर कॉलेजमध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या एकतेचा आणि गौरवाचा संदेश देणारा ठरला. प्राचार्य मांजरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने झाली. प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या भाषणात त्यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीचा विस्तृत इतिहास मांडला. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या यशस्वी संघर्षानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, याची आठवण करून दिली. "आम्ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेत्यांचे ऋणी आहोत. आज आपण महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासासाठी नेमकेपणाने काय केले पाहिजे, याचा विचार करूया. संस्कृती, भाषा, साहित्य आणि अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी प्रत्येक घटकाने कटिबद्ध होणे गरजेचे आहे," असे डॉ. मांजरे म्हणाले. अनेक महापुरुषांच्या कार्याचा व विचारांचा उल्लेख करून सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा विकासाबरोबर सर्व क्षेत्राचा सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे. यावेळी महाराष्ट्र दिनाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
याप्रसंगी अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य प्रिया गारोळे, प्रा. डॉ. स्मिता महाजन, प्रा. डॉ. विजयमाला चौगुले, डॉ. श्रीदेवी नकाते, उपप्राचार्य प्रा. भारत आलदर, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे, कार्यालयीन अधीक्षक संजय चावरे, प्राध्यापक वृंद तसेच प्रशासकीय सेवक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. प्रा. सुनील चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा