Breaking

रविवार, २६ ऑक्टोबर, २०२५

*जयसिंगपूर शहरात पुन्हा निर्घृण खून; नागरिकांत भीतीचे वातावरण, पोलिस अलर्ट मोडवर*

 

 जयसिंगपूर शहरातील तरुणाची हत्या 

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : शहरात पुन्हा एकदा खूनाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. रविवार, दि.२६ऑक्टोबर, २०२५ रोजी दुपारच्या सुमारास अंकली–उदगाव टोलनाक्याजवळ कृष्णा नदीच्या पुलाजवळ एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे.सदर मयत लखन सुरेश घावट-बागडी (वय वर्ष ३५)  हा तरुण नांदणी रोडवरील पाण्याच्या टाकीजवळील जयसिंगनगर झोपडपट्टी परिसरात राहत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

       दरम्यान, हत्येचे कारण आणि गुन्हेगार कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

  याआधीच दिवाळी पाडव्याच्या दिवशी गल्ली क्रमांक १३ मध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने शहर हादरले होते. त्या घटनेतील आरोपींना पोलिसांनी केवळ तेरा तासांत अटक केली होती. परंतु आज पुन्हा अशीच एक रक्तरंजित घटना घडल्याने जयसिंगपूरमध्ये भितीचे व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

     जयसिंगपूर पोलिस दल सध्या पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा