![]() |
हरवलेले मंगळसूत्र देताना जयसिंगपूर नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : गणेश विसर्जनाच्या दिवशी दसरा चौक स्टेडियम येथे उभारलेल्या कृत्रिम जलकुंडात मनिषा नरेंद्र पांडव यांचे अंदाजे २ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र निर्माल्यात हरवले होते. घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी श्रीमती टिना गवळी यांनी तातडीने स्वच्छता निरीक्षकांना शोधकार्याचे निर्देश दिले.
दिनांक ९ सप्टेंबर रोजी गट नं. ३७१ कचरा डेपो येथे सफाई कामगार श्रीमती कांचन मारुती बनसोडे व श्रीमती जयश्री दयानंद कांबळे यांच्या प्रयत्नांमुळे व प्रामाणिकतेमुळे मंगळसूत्र सापडले व कार्यालयात जमा करण्यात आले. खात्री करून नगरपरिषदेने मंगळसूत्र परत सौ. पांडव यांच्याकडे सुपूर्द केले.
या प्रसंगी कार्यालय अधीक्षक बाबासो हाक्के, स्वच्छता निरीक्षक चेतन कांबळे व विशाल धनवडे, शहर समन्वयक श्री. प्रतिक पवार, मुकादम शिवाजी कांबळे तसेच संबंधित सफाई कामगार उपस्थित होते.
मनिषा पांडव यांनी हरवलेले दागिने सुखरूप परत मिळाल्याने नगरपरिषद प्रशासन, आरोग्य विभागातील अधिकारी व सफाई कामगारांचे मनःपूर्वक आभार मानले. यामुळे नागरिकांचा नगरपरिषदेकडे विश्वास अधिक दृढ झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा