Breaking

सोमवार, १६ फेब्रुवारी, २०२६

*डॉ. एस. के. पाटील व डॉ. एस. एस. भिर्डी स्पर्धांचा बौद्धिक जल्लोष; प्रज्ञा माळकर व श्रद्धा मादनाईक प्रथमस्थानी *

 

 वक्तृत्व व निबंध स्पर्धेतील विजेते व मान्यवर


*प्रा. डॉ.संदिप तापकीर : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी संचलित जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ निमित्त आयोजित डॉ. एस. के. पाटील वक्तृत्व स्पर्धा व डॉ. एस. एस. भिर्डी आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संलग्नित महाविद्यालयांमधील एकूण ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत स्पर्धांना बौद्धिक जल्लोषाचे स्वरूप प्राप्त करून दिले.

      स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत व प्रसिद्ध व्याख्याते अशोक केसरकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे होते. मानव्यविद्याशाखा प्रमुख डॉ. विजयमाला चौगुले यांनी स्वागतपर भाषणातून संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत स्पर्धेच्या परंपरेची माहिती दिली. मराठी विभाग प्रमुख व प्रमुख संयोजक डॉ. संतोषकुमार डफळापूरकर यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेचे स्वरूप व उद्दिष्ट स्पष्ट केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.अंजना चावरे यांनी करून दिला.

      मार्गदर्शनपर भाषणात प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी वक्तृत्व व लेखनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची प्रभावी भूमिका पार पाडावी, असे प्रतिपादन करत वाचन, चिंतन व मूल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

         स्पर्धेतील निकाल : वरिष्ठ विभाग वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रज्ञा श्रीकांत माळकर (श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली) यांनी प्रथम क्रमांक, कु. वैष्णवी अनिल काळे (जयसिंगपूर कॉलेज) द्वितीय, तर सुजित भाऊसाहेब पानसंबळ (न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर) या तृतीय ठरले.  वरिष्ठ विभाग निबंध स्पर्धेत कु. श्रद्धा शिलकुमार मादनाईक (जयसिंगपूर कॉलेज) यांनी “स्त्री-पुरुष समानतेचे बदलते अर्थ” या विषयावर प्रभावी मांडणी करत प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक कु. नम्रता हरी कुंभार (सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड) यांनी मिळविला, तर तृतीय क्रमांक कु. सुहासिनी दिलीप कांबळे (म्हैसाळ महाविद्यालय) यांना प्राप्त झाला.

  कनिष्ठ विभाग निबंध स्पर्धेत कु. ललिता दिनकर भिसे (आझाद कॉलेज ऑफ सातारा) प्रथम ठरल्या.

        पारितोषिक वितरण समारंभ दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्थापन समितीचे खजिनदार मा. पद्माकर पाटील होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

      अध्यक्षीय भाषणात मा. पद्माकर पाटील यांनी आजच्या मोबाईल व सोशल मीडियाच्या युगात विद्यार्थ्यांनी बौद्धिक स्पर्धांना दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद समाधानकारक असल्याचे सांगून संयोजक मंडळाचे कौतुक केले. 

     एज्युकेशन सोसायटीच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, डॉ. धवलकुमार पाटील, डॉ. श्रीवर्धन पाटील, अशोक शिरगुप्पे, आदिनाथ मादनाईक,बिपीन खाडे, निखिल इंगळे व सर्व सदस्य,  प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे स्पर्धेसाठी बहुमोल मार्गदर्शन लाभले. मुख्य संयोजक प्रा. डॉ. संदीप तापकीरउपप्राचार्य प्रा. भारत आलदर व अधीक्षक संजय चावरे यांचे विशेष  सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा