![]() |
| दुचाकीच्या डिग्गीतून ८५ हजार लंपास |
*शाहिद सय्यद : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : येथील कोर्टासमोर लावलेल्या दुचाकीची डिग्गी फोडून दादासो पाटील (रा. ६ वी गल्ली, मादनाईक मळा, जयसिंगपूर) यांची ८५ हजार रुपयेची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरात तिघे चोरटे मोटरसायकलसहीत आढळून आले आहेत. पाटील हे येथील बँकेतून रक्कम काढून ते कोर्टात तारीख कधी आहे हे पाहण्यासाठी गेले होते. कोर्टासमोर मोटरसायकल लावल्यानंतर अवघ्या काही मिनिटात या चोरट्यांनी डिग्गी फोडून रोकड लंपास केली आहे. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसात झाली नव्हती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा