Breaking

रविवार, २३ मे, २०२१

"आनंदवार्ता!"कोरोना उपचाराचे पैसे परत मिळणार हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश"



 Adv. प्रविणकुमार माने : उपसंपादक

           मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महात्मा फुले  जन आरोग्य योजनेबाबत निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे या योजनेतील कोरोना उपचाराची बीले नागरीकांना परत मिळण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.कोरोनावरील उपचारासाठी आकारलेली बीले रूग्णांना परत मिळण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे सपष्ट निर्देश औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आहेत. तसेच रूग्णांना नुकसान भरपाई देण्यासाठी ही मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खास समिती गठित करण्याचे निर्देश मे.कोर्टाने दिलेले आहेत.याशिवाय रूग्णांना बीले परत मिळणेसाठी मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून मे. कोर्टाच्या निर्देशाचा सर्व नागरिकांना लाभ घेता येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा