मुंबई: कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणं आवश्यक आहे. काहीजण पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष करतात. कोरोनाचे दोन डोस घेण्याचे फायदे आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता अत्यंत कमी होते. मुंबई महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांचा कोरोनापासून बचाव होत असल्याचे समोर आले आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या डोसचा परिणाम होतो. पण दुसऱ्या डोसचा त्याहीपेक्षा जास्त फायदा होतो. मुंबई महापालिकेने एक जानेवारी ते १७ जून दरम्यान मुंबईतील २.९ लाख कोविड रुग्णांचे सर्वेक्षण केले. दुसरा डोस घेतल्यानंतर फक्त २६ जणांना कोरोनाची पुन्हा बाधा झाली, तर पहिला डोस घेतलेल्या १०,५०० जण कोविडची बाधा झाली.
सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईत आतापर्यंत ५३.८३ लाख लोकांचं लसीकरण झालं आहे. त्यात १० लाख नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. "लोकांच्या एका मोठ्या गटाला लसीपासून संरक्षण मिळतय. संपूर्ण लसीकरण झाल्यानंतर मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे" असे डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा