Breaking

सोमवार, २८ जून, २०२१

पती - पत्नीच्या जोडीने तिरंदाजी वर्ल्ड कप स्पर्धेत दिले भारताला तिसरे सुवर्णपदक

 

दीपिका कुमारी व पती अतनु दास

तिरंदाजी वर्ल्ड कप स्पर्धा : फान्सची राजधानी पॅरिसमध्ये सुरु असलेल्या तिरंदाजी वर्ल्ड कप स्पर्धेत नवरा-बायको असलेल्या जोडीने भारताला तिसरे सुवर्ण मिळवून दिले. तिरंदाज अतनु दास आणि त्याची पत्नी दीपिका कुमारीने रविवारी तिरंदाजी वर्ल्ड कप स्पर्धेत मिश्र संघात सुवर्ण कामगिरी नोंदवली. भारतीय जोडीने फायनलमध्ये नेदरलंडच्या जेफ वान डेन बर्ग आणि गॅब्रिएला शोलेसर जोडीचा 5-3 असा पराभव केला. भारताचे या स्पर्धेतील हे तिसरे सुवर्ण पदक आहे.यापूर्वी भारतीय महिला रिकर्व संघाने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कोमलिका बारी या तिघींनी मिळून भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले होते. या तिघींनी तिसऱ्या फेरीतील फायनलमध्ये मॅक्सिकोविरुद्ध सोनेरी कामगिरी केली होती. सध्या भारत सुवर्णपदक कमाईत प्रथम क्रमांकावर आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा