![]() |
अकिवाट ग्रामपंचायत |
प्रा.अमोल सुंके : अकिवाट प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील कृषी संपन्न असलेल्या अकिवाट ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ जयश्री पाटील यांची निवड झाली आहे निवडीचे पत्र सरपंच विशाल चौगुले यांनी दिले.
अगोदरच्या उपसरपंच सौ.कांचन कोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिले व रिक्त पदावर सौ. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. उपसरपंच पदाची वर्णी लागल्यानंतर सौ. जयश्री पाटील यांच्यावर अकिवाट गावाचा विकास करण्याची मोठी जबाबदारी आलेली आहे. याप्रसंगी सौ. पाटील म्हणाले की, माझ्यावर उपसरपंच पदाची जबाबदारी देऊन मला सामाजिक कार्य व गावाचा विकास करण्याची जबाबदारी सोपविली आहे त्यास कटिबद्ध असून मी माझे कार्य उत्तम पद्धतीने व प्रामाणिकपणे पार पाटील अशाप्रकारे त्यांनी आश्वासित केले.
सदर प्रसंगी सरपंच विशाल चौगुले, ग्रामसेवक निर्मळे,संजीव कोतळी, कुमार रानाडे ,अजितदादा फरांडे, अण्णासो पानदारे व सर्व ग्रामपंचायत सदस्य इत्यादी उपस्थित होते.
सौ. जयश्री पाटील यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व घटकाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा