पंढरपूर : भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोमध्ये इस्त्रोमध्ये काम करावे, असे अनेकांचे स्वप्न असते. पण हेच स्वप्न जर उराशी बाळगले तर नक्कीच पूर्ण होते, असा संदेश नुकतंच संपूर्ण महाराष्ट्राला मिळाला आहे. पंढरपुरातील एका तरुणाने इस्रोत भरारी घेतली आहे. विशेष म्हणेज भारतातील दहा जणांची निवड झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातून तो एकमेव तरुण आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
सोमनाथ नंदू माळी असे या तरुणाचे नाव आहे. ते पंढरपुर तालुक्यातील सरकोली इथे राहतात. सोमनाथचे आई-वडील आणि एक भाऊ दुसऱ्याच्या शेतात जाऊन मोल मजुरी करतो. मात्र असे असतानाही सोमनाथने जिद्दीने शिक्षण घेत थेट इस्रोपर्यंत मजल मारली आहे.
नुकतीच त्याची तिरुअनंतपुरम (केरळ) येथील ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. विशेष म्हणजे यासाठी भारतातून दहा जणांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामधून निवड झालेला सोमनाथ हा एकमेव विद्यार्थी आहे.
आधी इन्फोसेमध्ये नोकरी, नंतर इस्रोत शास्त्रज्ञ :
सोमनाथने एम.टेक.पूर्ण केल्यानंतर त्याने इन्फोसेसमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी त्याला विमानाच्या इंजिन डिझाईनवर काम करण्याची संधी मिळाली. पण त्याला इस्रोमध्ये काम करायचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यानुसार त्याने त्या दिशेने प्रयत्न सुरु केले.
नोव्हेंबर 2019 मध्ये सोमनाथने इस्त्रोसाठी अर्ज केला. एमटेकचे शिक्षण आणि इन्फोसिस मधील नोकरीचा अनुभव यामुळे अखेर सोमनाथला 2 जूनला इस्रोमध्ये नोकरीची ऑफर आहे. यावेळी त्याची वरिष्ठ शास्त्रज्ञ या पदासाठी निवड झाली आहे.
उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद :
दरम्यान घरातील परिस्थिती हलाखीची असताना शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आता उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण आहे. त्यामुळे कुटुंबियांच्या घामाचे सोने झाले, अशी प्रतिक्रिया सोमनाथने दिली. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा