Breaking

मंगळवार, १५ जून, २०२१

"तेरवाड येथे संत कवि मुक्तेश्वर महाराज यांच्या ३७५ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मुक्तेश्वर ऑक्सिजन पार्कचे केलं उदघाटन"

 




सौंदर्या पोवार : प्रमुख प्रतिनिधी


    ऑक्सिजन ही एक निसर्गातून मिळणारी फुकट देणगी असून हिच देणगी आपल्या पुढच्या पिढीला मोफत उपलब्ध व्हावी व कोरोना सारख्या आजारापासून आपल्या सर्वांचे रक्षण व्हावे हाच एकमेव प्रामाणिक हेतू ऑक्सीजन पार्कच्या उद्घाटनाचा होता. या हेतूच्या पार्श्वभूमीवर पंचगंगेच्या तीरावर तेरवाड येथे समाधी घेतलेले संत कवि मुक्तेश्वर महाराज यांच्या 375 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कै. गोविंद बंडू आवळे सोशल फौडैशन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज मुक्तेश्वर आँक्सिजन पार्कचे उदघाटन वृक्षारोपण करून करण्यात आले.



    या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मा. उमेश आवळे  यांनी केले. या उपक्रमाचे मा. रामभाऊ डांगे तात्या यांनी मनसोक्त कौतूक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच डाँ बाबासाहेब आंबेडकर संस्था बार्टी पुणे यांचे सुपरवायझर सौ सुनंदा मेटकर मँडम यांनी आपल्या संस्थेची माहीती दिली व भविष्यात अजून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्या साठी जास्तीत जास्त झाडे देण्याचे आश्वासन दिले. उपस्थित असणाऱ्या सर्व वारकरी संप्रदायातील घटकांचे पुष्प गुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.

  या प्रसंगी उदघाटक मा.श्री. रामभाऊ डांगे (तात्या )नगरसेवक कुरूंदवाड, तेरवाडच्या सरपंच सौ. लक्ष्मीबाई परशुराम तराळ ,श्रीमती शोभा गोविद आवळे ग्रा. पं. सदस्या,म्हादगौडा पाटील ग्रा. पं.सदस्य, महावितरण अधिकारी मयुर आवळे साहेब, शशिकांत घाटगे सचिव साहेब, आमगौडा पाटील भाजप शहर अध्यक्ष, अमोल खोत सर,परशुराम तराळ साहेब, अरूण भंडारे, संजय डाफले, मुरग्याप्पा हेगडे, सुखदेव हेगडे, बंडू पाटील उपस्थित होते. 

       उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर व गावकऱ्यांचे मनस्वी आभार अमोल खोत यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा