Breaking

शनिवार, १९ जून, २०२१

"ऐतिहासिक कामगिरी बजाविणारा खेळाडू मिल्खा सिंग काळाच्या पडद्याआड"

 



करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी


पूर्ण नाव : मिल्खा सिंग.                 

जन्म : ०८ ऑक्टोबर १९३५

ठिकाण : फैसलाबाद

मृत्यू :१८ जून २०२१                                           

  देश : भारत

खेळ : धावपटू

                                                                   

       भारत पाकिस्तानच्या फाळणीमध्ये मिल्खा सिंग यांनी आपल्या आई वडिलांना गमावलं.आणि ते शरणार्थी बनून रेल्वे मधून पाकिस्तानातून भारतात आले.अशा भयानक परिस्थितीतून आल्यानंतर मिल्खा सिंग यांनी काहीतरी करण्याचा निर्धार केला. 

   बालपणीच भयावह परिस्थितीला तोंड देणारा हा खेळाडू जगासाठी एक मोठा आदर्श बनला.'फ्लाईंग शीख' या टोपण नावाने ओळखले जाणारे धावपटू मिल्खा सिंग. रोम येथे झालेल्या १९६० व टोकियोतील १९६४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.पतियाळा येथे १९५६ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दोन वर्षांनी झालेल्या स्पर्धेत त्याने २०० व ४०० मीटर शर्यंतीत विक्रमी वेळ नोंदवली.

     १९५८ मध्ये टोकियोत झालेल्या आशियाई स्पर्धत त्यांनी आपली कामगिरी कायम ठेवत २०० व ४०० मीटर शर्यतीत नवा आशियाई विक्रम नोंदविला.

    सहा सप्टेंबर १९६० ला ऑलिम्पिकमध्ये त्यांनी चारशे मीटर शर्यतीत आपला मागच्या वर्षीचा विक्रम मोडला. त्या शर्यतीत तो चौथा आला. ०.१ सेकंदाने त्यांचे कास्य पदक हुकले होते. त्या स्पर्धेमध्ये ते कोणत्याही सरावाशिवाय व बुटांशिवाय धावले होते.

त्याआधी त्यांनी १९५८ च्या राष्ट्रकूल स्पर्धेत २०० व ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले होते. १९६२ च्या आशियाई स्पर्धेत २०० मीटर शर्यतीही सुवर्णपदक जिंकले होते.

    मिल्खा सिंग हे असे धावपटू होते की त्यानी कोणत्याही सरावाशिवाय,आर्थिक मदतीविना व कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटर हे अंतर त्यानी ४५.९ सेकंदात पार केले. त्यांचा विक्रम अजूनही कोणत्यही भारतीयाला मोडता आलेला नाही.

     त्या काळात मिल्खा सिंग हे देशभरातील तरूणांचे आदर्श होते. त्यांनी जिंकलेली सर्व पदके, चषक, ब्लेझर व जे बूट घालून त्यांनी विक्रम मोडला ते बूट त्यांनी राष्ट्रीय खेळ संग्रहालयाला दान केले. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.मिल्खा सिंग यांनी १८ जून २०२१ रोजी  चंदीगड च्या पीजीआईएमईआर या इस्पितळात अखेरचा श्वास घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा