Breaking

बुधवार, ९ जून, २०२१

"जयसिंगपूर शहरात उसळली प्रचंड गर्दी,नागरिकांचे बेफिकीर वर्तन;कोरोना नियमांना हरताळ"


करण व्हावळ/ जयसिंगपूर प्रतिनिधी :


     शासन नियमाप्रमाणे जयसिंगपूर शहर व परिसरात लॉकडाऊन हटविले असता कोरोना साथ संपल्याच्या अविर्भावात नागरिक बेजबाबदारपणे व कोरोना नियमांना हरताळ फासून प्रचंड गर्दीने विविध आस्थापनेजवळ उभ्या असल्याचे दिसून येत आहे.जयसिंगपूर मधील भाजी मंडई, बँका व बाजारपेठेत पेठेत ही सर्वत्र असेच दृश्य दिसत आहे.

   मागच्या वर्षी ज्याप्रमाणे लॉकडाऊन हटवल्यांनतर जी बेशिस्त व बेजबाबदारपणे कोरोना नियमांचे उल्लंघन लोकांनी केले.त्याचा परिणामी म्हणून दुसऱ्या लाटेला संपूर्ण देशाला सामोरे जावे लागले हे सत्य वास्तवता आपल्यासमोर आहे.    

   शासन पातळीवर प्रत्येक घटक आपला जबाबदारीने आपलं कर्तव्य प्रामाणिक पणे निभावत आहे. अशावेळी जयसिंगपूर नगरपरिषद व जयसिंगपूर पोलीस ठाणेच्या माध्यमातून कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात तमाम नागरिकांनी जबाबदारीने व शिस्तबद्ध प्रतिसादही दिला. परंतु पुन्हा नागरिकाकडून या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यात तिसऱ्या लाटेला ही सामोरे जावे लागेल यात काही शंकाच नाही.

      आपण सर्व सुज्ञ नागरिक बंधुनो आपण कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले आणि प्रत्येकाने जबाबदारी बाळगली तर येणाऱ्या तिसऱ्या लाटेला आपण रोखण्यात यशस्वी होणार आहोत. त्यामुळे शासनाची एक मोहिम 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हे यशस्वी होताना दिसून येणार आहे. आपण सर्वांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी अशी अपेक्षा आहे. कारण आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित तर समाज व देश सुरक्षित राहणार आहे. तसेच सर्व जबाबदारी प्रशासन व पोलिस यंत्रणेवर टाकण्यापेक्षा नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे हा उत्तम पर्याय आहे.



1 टिप्पणी: