गीता माने / सहसंपादक :
कोल्हापूर जिल्हा मा.पोलीस अधीक्षक यांच्या 'मिशन संवेदना' या उपक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेच्या वतीने कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी व समाजातील गरीब व गरजू घटकांना मदत करण्याच्या हेतूने हा उपक्रम मोठ्या आनंदाने राबविला जात आहे.
दि. ३/६/ २०२१ रोजी शिरोळ पोलीस ठाणे व KPT कंपनीचे मालक श्री कुलकर्णी (सुप्रसिद्ध उद्योजक) यांच्या संयुक्त विद्यमाने ३५ रेशन किटचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविलं आहे. यासाठी सुरुवातीस
KPT कंपनीचे मॅनेजर, श्री कुलकर्णी ,श्री कोगनोळे व मा. एसडीपीओ, जयसिंगपूर श्री रामेश्वर वैंजने यांच्या हस्ते नांदणी नाका येथील लमाण तांडा व डवरी झोपडपट्टीमध्ये राहणारे गरीब,गरजू व निराधार लोकांना ८ दिवस पुरेल एवढे ३५ रेशनचे किट वाटप केले.
यावेळी मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. कुंभार साहेब,पोलीस उपनिरीक्षक मा.सुळ साहेब, मदन मधाळे, संजय नाईक, ज्ञानेश्वर काळेल,ASI पुजारी, सौ कदम, सौ गायकवाड व होमगार्ड हा सर्व स्टाफ उपस्थित होता. शासन नियमांना अधीन राहून हा उपक्रम राबविला गेला.
या उपक्रमामुळे समाजातील या वंचित घटकांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसत होते. या स्तुत्य उपक्रमामुळे शिरोळ पोलीस ठाण्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा