Breaking

शनिवार, १२ जून, २०२१

"कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाकडून सामाजिक संवेदनशील व्यक्तिमत्व डॉ.पांडुरंग खटावकर यांना धन्वंतरी पुरस्कार जाहीर"

डॉ.पांडुरंग खटावकर

हिना मुल्ला / प्रमुख प्रतिनिधी :


         कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून ११ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘धन्वतंरी पुरस्कार’जाहीर झाले आहेत. त्यापैकी जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख व सामाजिक संवेदनशील डॉ.पांडुरंग खटावकर यांना धन्वंतरी पुरस्कार जाहीर झाला आहे.

   २०१९-२० या वर्षातील कामकाजावर आधारित पुरस्कार आहेत. आरोग्य विभागाच्या विविध योजना, उद्दिष्टपूर्ती, आयपीडीमधील काम,पूरपरिस्थितीमधील कामाची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले होते. सन्मानचिन्ह,पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

        'धन्वतंरी' पुरस्कार प्राप्त वैद्यकीय अधिकारी पुढीलप्रमाणे आहेत.

वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र गोपाळ गुरव (प्राथमिक आरोग्य केंद्र मलिग्रे, आजरा), डॉ. ज्ञानेश्वर विनायक हावळ (प्राथमिक आरोग्य केंद्र मडिलगे, भुदरगड), डॉ. अस्लम ईस्माइल नायकवडी (प्राथमिक आरोग्य केंद्र तुडये, चंदगड), डॉ. गीता प्रशांत कोरे (प्राथमिक आरोग्य केंद्र कडगाव, गडहिंग्लज), डॉ. सुप्रिया विजय खन्ना (प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव, गडहिंग्लज), डॉ. वृषाली मधुकर कारंडे (प्राथमिक आरोग्य केंद्र निवडे, गगनबावडा), डॉ. अभिजीत नयनकुमार शिंदे (प्राथमिक आरोग्य केंद्र कसबा सांगाव, कागल), डॉ. मधुरा विलास मोरे (प्राथमिक आरोग्य केंद्र माळयाची शिरोली. करवीर),डॉ. राजेंद्र मारुती कांबळे ( प्राथमिक आरोग्य केंद्र राशिवडे, राधानगरी), डॉ. कृष्णात पंडितराव चव्हाण (प्राथमिक आरोग्य केंद्र कोतोली, पन्हाळा), डॉ. नरेंद्र शंकर माळी (प्राथमिक आरोग्य केंद्र भेडसगाव, शाहूवाडी),डॉ.पांडुरंग खटावकर (प्राथमिक आरोग्य केंद्र, जयसिंगपूर ता. शिरोळ)

      जयसिंगपूर शहर व जयसिंगपूर परिसरातील प्रत्येक घटकाला शासकीय वैद्यकीय सेवेचा लाभ व्हावा यासाठी अहोरात्रपणे धडपडणारे वैद्यकीय अधिकारी आहेत. तसेच अत्यंत प्रामाणिक व कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून ते सर्वांना सुपरिचित आहेत. कोरोना महामारीच्या काळात कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न खूप मोलाचे आहेत.गरीब व गरजू कोरोना रूग्णांना हक्काचा व विश्वासा पात्र डॉक्टर म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे. शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ परिसरातील व कार्यक्षेत्रातील लोकांना व्हावा यासाठी आपल्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी या टीमच्या सहकार्याने जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ते सातत्याने करीत असतात.

        जयसिंगपूरच्या या संवेदनशील व कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकार्‍याला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून धन्वंतरी हा पुरस्कार जाहीर होणे म्हणजे त्यांच्या प्रामाणिक कार्याला व वैद्यकीय क्षेत्रातील एका  सच्चा अधिकाऱ्याला प्रोत्साहन व सेवा करण्याचं बळ देण्यासारखे आहे हे मात्र सत्य आहे.

       त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे शिरोळ तालुक्यातील प्रत्येक घटकाला समाधान व आनंद वाटत आहे.

1 टिप्पणी: