प्रा.डॉ.प्रभाकर माने / मुख्य संपादक :
पुणे: प्राध्यापक भरती व इतर मागण्यांसाठी सेट-नेट व पीएच.डी. संघर्ष समितीद्वारे पुणे शिक्षण संचालक कार्यालयासमोर २१ जून पासून बेमुदत सत्याग्रह पुकारला होता.
मुळात ही संघर्ष समिती महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी यूजीसीच्या नियमाप्रमाणे पात्रता असूनही राज्य सरकारकडून प्राध्यापक पदाची पूर्णवेळ जाहिरात काढावी या प्रमुख मागणीसह इतर सर्व मागण्यांची पूर्तता व्हावी अशी अपेक्षा होती.परंतु सरकारच्या उदासीनतेमुळे या कृतिशील संघर्ष समितीने बेमुदत आंदोलन सुरुवात केली होती.
मात्र आंदोलनाची दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने एकत्रित विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी बैठक बोलविण्यात आली. त्यानुसार तंत्र व उच्च शिक्षणमंत्री मा. उदय सामंत व नेट-सेट,/पीएच.डी.धारक संघर्ष समिती यांच्यात चाललेल्या या बैठकीत विविध मागण्यावरती सकारात्मक विचार होऊन त्यांनी काही मागण्या मान्य केले आहेत.
1. प्राध्यापक भरतीला पुढील आठवड्यापासून सुरुवात
2. सीएचबी धोरण रद्द करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापन, (समितीची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत सीएचबीधारकांना समाधानकारक वेतनवाढ)
3. संवर्गनिहाय आरक्षण लागू करण्याबाबत ही लवकरच कार्यवाही सुरू होणार
कोविड-१९ मूळे जी ३०७४ प्राध्यापकांची भरती थांबली होती त्याला उच्च शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे.आणि ती फाइल अर्थमंत्रालयाकडे पाठवण्यात आली असून त्याला अर्थ मंत्री श्री. अजित पवार पुढील आठवड्यात मान्यता देणार असून त्याबाबतचा जी.आर. निघेल आणि प्राध्यापकांच्या ३०७४ पदांच्या भरतीला महाविकास आघाडी सरकार मान्यता देणार आहे.
तसेच या मीटिंग मध्ये तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात येणार आहे त्याबद्दल श्री उदय सामंत यांनी घोषणा केली ती पुढील प्रमाणे:
१. अगोदरचा प्रती तास ५०० रुपये चा निर्णय बदलून यूजीसी च्या नियमानुसार ४८ मिनिटांसाठी ६१५ रु यूजी साठी वाढ देण्यात आली आहे. प्रॅक्टिकल साठी १५० रु वरून २५० रु वाढ देण्यात आली आहे तसेच
२. पी.जी. साठी ६०० रु वरुन ७५० रु इतकी वाढ देण्यात आली आहे तर प्रॅक्टिकल साठी २५० रु वरून ३०० रु वाढ देण्यात आली आहे.
३. यासोबतच शारीरिक शिक्षण, पदवी आणि व्यावसाईक अभ्यासक्रमासाठी ६०० रु वरून ७५० रु तसेच विधी साठी ६०० रु वरून ६५० रु व २५० रु वरून ३०० रु अशी वाढ देण्यात येणार आहे.
या प्रमुख मागण्यांना हिरवा कंदिल मिळाला असून या नेट-सेट व पीएच.डी.धारक संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. त्यामुळे तूर्तास तरी सदर प्राध्यापक वर्गांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा