शशिकांत घाटगे / जांभळी प्रतिनिधी :
जांभळी येथे नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र जांभळी व ग्रामपंचायत यांच्या संयुक्तपणे १५५ नागरिकांचे कोरोना अँटीजन टेस्ट करण्यात आली.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जांभळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून विविध व्यावसायिकांची कोरोना अँटीजन टेस्ट करण्यात आल्या. याकरिता जांभळी गावातील अत्यावश्यक सेवेतील किराणामाल दुकानदार, भाजीपाला विक्रेते, दुग्ध व्यावसायिक,ऊस रोपवाटिका कर्मचारी, सलून व्यावसायिक, पाणी पुरवठा विभाग, पॉझिटिव्ह सदृश्य परिसरातील व्यक्ती तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व गावात विनाकारण फिरणारे नागरिक यांची टेस्ट करण्यात आली.
वैद्यकीय अधिकारी डॉ.पूजा अस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक व्ही. के. शिंदे, आरोग्यसेविका ए. एन .मेवेकरी,आशा वर्कर वैशाली यादव, सविता फारणे आरोग्य मदतनीस रेहना मुजावर, सिया लॅब जांभळी टेक्निशियन नम्रता घाटगे व अभिषेक लोखंडे यांनी कोरोना टेस्ट केल्या.
'माझं गाव कोरोनामुक्त गाव' ही मोहीम यशस्वीपणे राबविताना सरपंच खंडू खिल्लारे, उपसरपंच श्रीधर फारणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक हेमंत जाधव, कर्मचारी राजीव कांबळे,पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्ते के. आर. चव्हाण,बाबगोंडा पाटील, शशिकांत घाटगे,अनिल कोळी, राजू सूर्यवंशी व समाजकार्य न्यूजचे संपादक दत्ता कदम व विविध मान्यवर जातीने लक्ष घालून नागरिकांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न करीत होते.
आजच्या या उपक्रमामुळे जांभळीकर व व्यावसायिक घटक यांच्याकडून कौतुक होताना दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा