नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून ग्राहकांच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये आता घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी (LPG customers) आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या ग्राहकांना आता एलपीजी गॅस सिलेंडर भरण्यासाठी (LPG Refill) गॅस डिस्ट्रिब्युटरची निवड स्वत: करण्याची सवलत देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ही सुविधा चंदीगड, कोयंबटूर, गुरुग्राम, पुणे आणि रांची येथील ग्राहकांना उपलब्ध करुन दिली जाईल, असे पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाने (Ministry of Petroleum & Natural Gas) म्हटले आहे. या शहरांमध्ये ही योजना यशस्वी झाल्यास ती देशातील इतर शहरांमध्येही लागू केली जाईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा