कराड: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी केलेल्या निर्देशांचे व आदेशांचे उल्लघंन केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यासह 70n ते 80 धारकर्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवार दि. 5 रोजी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लघंन करुन त्यांनी कराड शहरात बेकायदा जमाव जमवून रॅली काढली व मंदीर प्रवेश बंदी असतानाही मंदीर उघडून मंदीरात प्रवेश केला. याबाबतची फिर्याद पोलिस हवालदार प्रशांत पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
भिडे गुरुजींसह सागर आमले, अजय पावस्कर, केदार डोईफोडे, प्रवीण माने, गणेश कापसे, रणजित पाटील, सुदर्शन पाटसकर यांच्यासह 70 ते 80 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे पायी दिडीं काढून जाण्यासाठी शासनाने बंदी घातली आहे. परंतु ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लघंन करुन आषाढी वारीसाठी जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले. शासनाने बंडातात्या कराडकर यांच्यासह वारकर्यांना वारीसाठी परवानगी द्यावी. या मागणीला समर्थन देत सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास संभाजी भिडे गुरुजी दत्त चौक कराड येथे आले. यावेळी त्यांच्यासह शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या 70 ते 80 धारकरी बंद असलेले साईबाबा मंदीर उघडून आत बसले. त्यामुळे जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे.
तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परवागनी न घेता, जमाव जमवून मोटर सायकल रॅली काढली. यावेळी रॅलीत सहभागी धारकर्यांनी विना मास्क शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचा भगवा झेंडा हातात घेवून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दत्त चौक ते प्रशासकीय इमारत येथे घोषणा बाजी करत पायी चालत जात तहसिलदार यांना निवेदन दिले. यावेळीही त्यांनी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लघंन केल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा