![]() |
संग्रहित |
कोल्हापूर : दरवर्षी ज्या धरणाच्या पाणी साठ्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसतो. त्या अलमट्टी धरणातून सध्या 97 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा मोठी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी झालेली आहे. 2019 मध्ये अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे या धरणातून नियमितपणे पाणी विसर्ग व्हावा अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून तसेच कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून होत राहिली. तरीही याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्नाटक सरकार विरुद्ध महाराष्ट्र विशेषत: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिक संताप व्यक्त करत राहिले. दरम्यान यावर्षी मात्र वेळेत पाणी विसर्ग करत कोल्हापूरसह सांगलीला दिलासा दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा