सोलापूर – सोलापुरात सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह सहाय्यक पोलीस निरीक्षकाला तब्बल 7.5 लाखाची लाच घेताना लाचलुचपतविरोधी पथकाने रंगेहात पकडले असून पोलीस निरीक्षक संपत नारायण पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे असे दोघा लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुरूम चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील आरोपींना मदत करून गुन्ह्यातून सही सलामत सुटण्यासाठी सहकार्य करण्यासाठी पोलीस निरीक्षक संपत पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे याच्याकरवी 10 लाख रूपयाची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती साडेसात लाख रूपये देण्याचे ठरले.
त्यावरून तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर तक्रारीची खातरजमा करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जुना पुना नाका छत्रपती संभाजी महाराज चौकात सापळा लावला असता सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे याने पैसे स्विकारत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.
या घटनेमुळे सोलापूर शहरात एकच खळबळ माजली असून या विभागात बेकायदेशीर व लाचखोरीचे कृत्य करणाऱ्या घटकावर कारवाई झाल्यामुळे नागरिकाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा