Breaking

मंगळवार, १३ जुलै, २०२१

"प्रा.सौ.शामला राजाराम महाडिक यांनी शिवाजी विद्यापीठाची इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या विषयात पीएच.डी.पदवी संपादन"


डॉ. शामला राजाराम महाडिक


प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक


जयसिंगपूर ता.शिरोळ येथील डॉ.सौ.शामला राजाराम महाडिक (सध्या रा. संभाजीपूर जयसिंगपूर)यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी नुकतीच 'इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग मध्ये पीएच.डी. ही पदवी जाहीर केली. डॉ. महाडिक यांनी "डिझाईन ऑफ ॲक्टिव अँड पॅसिव्ह  मल्टीबँड मायक्रो स्ट्रिप अँटेना फॉर इमर्जिंग वायरलेस टेक्नॉलॉजी" या विषयावर शिवाजी विद्यापीठास प्रबंध सादर केला.  या संशोधनासाठी डॉ.शामला महाडिक यांना डी.ओ. टी, शिवाजी विद्यापीठाचे डॉ.यु. एल.बोंबले यांचे मार्गदर्शन तर डॉ.जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग जयसिंगपूूूरचे  चेअरमन  श्री. विजयराज मगदूम यांचे अनमोल सहकार्य लाभले. वडील श्री. रामराव कृष्णराव शेवाळेे,रिटायर्ड रजिस्ट्रार, न्यू कॉलेज कोल्हापूर व चुलते डॉ. श्री. पांडुरंग रंगराव शेवाळेे, प्राचार्य, डी.डी.शिंदे सरकार कॉलेज कोल्हापूर यांची प्रेरणा व आशीर्वाद लाभले.




       प्रा.डॉ.शामला महाडिक यांची डॉ.  जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये विद्यार्थीप्रिय व आदर्श शिक्षिका म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केल्यामुळे विद्यार्थी वर्ग व इतर सर्व घटकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा