![]() |
| मयत प्राजक्ता राहुल देसाई, सांगली |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
सांगली : शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली असून सांगली येथील एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. प्राजक्ता राहुल देसाई (वय २४, रा. खाण-भाग, सांगली) असे मयत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्राजक्ता देसाई यांनी उदगाव–अंकली दरम्यान असलेल्या कृष्णा नदीच्या पुलावरून नदीच्या पात्रात उडी टाकून आत्महत्या केली. सदर घटना ही आज 13 जानेवारी, 2026 रोजी दुपारी 1.30 वाजता घडली असल्याची माहिती मिळाली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.
या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा अधिक सखोल तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा