Breaking

शुक्रवार, १६ जुलै, २०२१

सांगली जिल्ह्यातील एका तरुण सिव्हिल इंजिनिअरने कोरोनाला घाबरून केली आत्महत्या

 


सांगली जिल्ह्यातील इटकरे येथील एका तरुणाचा कोरोना  चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भीतीने त्याने गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसा दिवशीच त्या तरुणाने आपलं जीवन संपवलं आहे. निखिल लक्ष्मण भानुसे (वय, 28) असं त्या तरुणाचे नाव आहे. ही दुर्देवी घटना (15 जुलै) बुधवारी रात्री घडली आहे. निखील हा व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर होता.

    मृत निखिल भानुसे हा सिव्हिल इंजिनियर होता.तीनच महिन्यापुर्वी त्याचा विवाह झाला होता. निखिलला चार दिवसापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्याने व या भीतीने त्याने आत्महत्या केली आहे.

      दरम्यान, कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह  आल्यापासून तो अस्वस्थ होता.

त्याच नैराश्यातून त्याने रात्री उशीरा घरासमोरील जनावारांच्या शेडमध्ये गळफास लावून घेतला.

अशी फिर्याद निखिलच्या नातेवाईकांनी पोलिसांत दिली आहे.

दरम्यान, याप्रकरणी कुरळप पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा