प्रा.अमोल सुंके : कुरुंदवाड प्रतिनिधी
कुरूंदवाड शहरामध्ये नगरपरिषदेच्या वतीने शहरात येणाऱ्या नागरिकांची युद्धपातळीवर रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे.
वाढता कोरोना महामारीचा प्रादुर्भाव पाहता व कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी कुरुंदवाड नगरपरिषदेच्या वतीने बेजबाबदार व अनावश्यक पद्धतीने फिरणाऱ्या तसेच शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात येत असून आज या मोहिमेचा 26 वा दिवस आहे अशा प्रकारची माहिती नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दिली.
रॅपिड अँटीजन टेस्टच्या अनावश्यक भीतीमुळे अनावश्यक व बिनकामाचे फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांची संख्या घटली असून जे नागरिक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत अशा नागरिकांना कोविड सेंटर मध्ये भरती करण्यात येत आहे.
याकामी राजाराम गोरे, निशिकांत ढाले,सतीश कांबळे,सौरभ कोठावळे सचिन थरकार,रोहित ढाले,अभिजीत कांबळे,अर्जुन पाटील व फायरमन रमेश शेलार हे सर्व नगरपरिषदेचे कर्मचारी जबाबदारीने व अहोरात्रपणे काम करीत आहेत.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगरपरिषदेने केलेलं कार्य हे वाखाणण्याजोगा आहे अशा प्रकारची चर्चा सर्वत्र होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा