Breaking

रविवार, २५ जुलै, २०२१

शिरोळ तालुका महापुरात पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांचे सेवाभावी भरीव योगदान

 

मा.दत्तात्रय बोरीगिड्डे व त्यांची टीम

प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक


     दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिरोळ तालुक्यात पुराची किंबहुना 2005 व 2019 प्रमाणे महापूराची यावर्षी ही भयावह  स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये प्रत्येक घटक स्वतःच्या कुवतीप्रमाणे सेवा भावी वृत्तीने काम करीत आहे मात्र जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे व त्यांच्या साथीदारांचे महापुरात अडकलेल्या लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी तसेच निर्बंध घातलेल्या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना व हौशी लोकांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद केला जात आहे.

    गेल्या दोन दिवसापासून कवठेसार येथे अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रत्यक्षपणे व जातीने लक्ष घालून सुखरूपपणे तेथील नागरिकांना बाहेर काढले जात आहेत. त्याचबरोबर उदगाव येथे कोल्हापूर-सांगली मार्ग महापुरामुळे बंद असल्याने तेथे काटेकोर व कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून स्वतः मा.बोरिगिड्डे  पुराच्या पाण्यात उतरून नागरिकांना अटकाव करीत आहे.      

    तसेच कोथळी व दानोळी या गावातील नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न  त्यांचा व त्यांच्या टीमकडून होताना दिसत आहे. खरं म्हणजे खाकी वर्दीतील अशी सेवाभावी वृत्तीने काम करणारी माणुसकी हे देशाच्या एकूणच समाजाच्या दृष्टीने प्रेरणादायी, आनंददायी व कल्याणकारी आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात ज्या पद्धतीने गुन्हेगार व गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक ठेवण्याचं काम केलं कर्तव्यनिष्ठेपायी व आत्मीयतेने केले जाते.तसेच कार्य किंबहुना त्यापेक्षाही उत्तम कार्य या महापुराच्या काळात होताना दिसत आहे. हे कार्य गेल्या तीन दिवसापासून अहोरात्रपणे सुरू आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत सर्वत्र त्यांच्या कार्याचे फोटो व व्हिडिओ  व्हायरल झाले आहेत. पुनश्च एकदा त्यांना व त्यांच्या पूर्ण टीमला मानाचा सलाम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा