Breaking

मंगळवार, १३ जुलै, २०२१

"रुकडी कॉलेजची सोनाली साळोखे हिचा शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. अर्थशास्त्र या विषयाच्या मेरिट लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानी"

 

सोनाली साळोखे


प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी


रुकडी : राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. साळोखे सोनाली सुहास हिने शिवाजी विद्यापीठाने मार्च २०२० मध्ये घेतलेल्या एम.ए. अर्थशास्त्र या विषयाच्या परीक्षेत ७६.६३ टक्के गुण मिळवून शिवाजी विद्यापीठाच्या मेरिट लिस्टमध्ये तिसरा क्रमांक मिळविला. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विजय देसाई, व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिंदुराव संकपाळ व अर्थशास्त्र विभागातील इतर शिक्षकांचे  मार्गदर्शन मिळाले. महाविद्यालयाच्या वतीने  तिच्या यशाबद्दल  अभिनंदन करण्यात आले.

    तिच्या या शैक्षणिक गुणवत्तापूर्ण सुयशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा