Breaking

सोमवार, १२ जुलै, २०२१

"४० व्या कोल्हापूर जिल्हा युवा महोत्सवाचे उद्घाटन; कला व आरोग्य हे परस्परपूरक असून तेच खऱ्या जीवन समृद्धीचा राजमार्ग : कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के"

 


प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक


 शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास व श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊस संचलित 'न्यू कॉलेज,कोल्हापूर' यांच्या संयुक्त विद्यमाने '४० व्या युवा महोत्सवाचे'उद्घाटन आभासी पद्धतीने शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी.शिर्के यांनी केले.

      कलाविष्काराचे नेत्रदीपक दर्शन घडविणाऱ्या या युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे स्वागत न्यू कॉलेजचे कार्यशील प्राचार्य,डॉ. व्ही.एम.पाटील यांनी केले. तसेच न्यू कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये पहिला ऑनलाईन युवा महोत्सव आयोजित करण्याचा बहुमान व जबाबदारी मिळाल्याबद्दल मनस्वी आनंद ही व्यक्त केला. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे कर्तव्यदक्ष व विद्यार्थीप्रिय संचालक डॉ.आर.व्ही.गुरव यांनी ४०व्या युवा महोत्सवाचा सांगोपांग आढावा घेऊन विद्यार्थ्यांचा मनापासून कौतुक करून 19 कला प्रकारांमध्ये चारशे पन्नास अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविल्याचे सांगून सहभागी कलाकार विद्यार्थ्यांनी अत्यंत जल्लोषाने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन या निमित्ताने केले.

      या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी.शिर्के म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासामध्ये प्रथमच ऑनलाइन पद्धतीने युवा महोत्सव आयोजित केलेला आहे गेले काही महिने कोणाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थीवर्ग तणावाखाली आहे. अशा परिस्थितीत शिवाजी विद्यापीठाची युवा महोत्सव आयोजित करण्याची परंपरा खंडित न करता विद्यार्थी, प्राध्यापक व  रसिक प्रेक्षक यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी व कलेचा आस्वाद घेण्यासाठी युवा महोत्सव आयोजित केलेले आहे. यापुढे ते म्हणाले, उत्तम आरोग्य व आनंददायी कला यांचा परस्परांशी संबंधित असून असून आरोग्यपूर्ण, सुखी व समृद्ध जीवनाचा तो एक राजमार्ग आहे.

     या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असलेले प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊसचे चेअरमन मा.के.जी.पाटील यांनी स्पर्धकांचे अभिनंदन करून सदर विद्यार्थ्यांनी कोरोना संसर्ग व प्रतिकूल परिस्थिती मध्ये सहभाग घेतल्याचे सांगून भविष्यकाळात शिवाजी विद्यापीठ व न्यू कॉलेज कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी कल्याण व विकासासाठी विविध उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

   या उद्घाटन सोहळ्याचे यथोचित आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. ए.एम.शेख यांनी मानले, तर सदर कार्यक्रमाचे उत्तम  सूत्रसंचालन प्रा.आर.डी. धमकले यांनी केले. सदर ऑनलाइन उद्घाटन समारंभ प्रसंगी  शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील  प्राध्यापक, कलाकार विद्यार्थी व हौशी रसिक प्रेक्षक उपस्थित होते.

          सदर उद्घाटन कार्यक्रम आणि ३ दिवस चालणारा युवा महोत्सव यशस्वीपणे होण्यासाठी न्यू कॉलेजच्या विविध कमिटीच्या माध्यमातून जय्यत तयारी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा