शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी - रोहित जाधव
तमदलगे येथील सार्वजनिक शौचालयांची दुरवास्था झाली असून आतुन कड्या तुटलेल्या, बाजुचा सर्व परिसर दलदलीचा झाला असुन गेले दोन वर्षांपासून तमदलगे ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील महिला ग्रामपंचायतीच्या कारभारात बदल संताप व्यक्त करत आहेत.
काही वर्षांपूर्वी महिलासाठी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली. मात्र शौचालयांच्या आतील कड्या तुटलेल्या असल्याने अक्षरशः दरवाजास बांधावे लागत आहे.शौचालयांच्या परिसरामध्ये ठिक ठिकाणी प्रचंड कचरा साचला असून सध्या पावसामुळे तर परिसरामध्ये दलदल झाली आहे.या घाणी आणि दुर्गंधीमुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान मागण्यास येणारे तथाकथित पुढारी मात्र मुग गिळून गप्प का आहेत हा प्रश्न येथील महिलांना पडला असुन यापुढे मत मागायला येणाऱ्या पुढार्यास शौचालयासमोर उभा करून जाब विचारणार असल्याचा संताप महिला वर्गात व्यक्त केला जात आहे. अनेक वेळा या सगळ्या समस्या ग्रामपंचायतीच्या निर्दशनास आणून सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील महिला संतप्त झाल्या आहेत. कित्येकदा महिला ग्रामस्थांनी तोंडी तक्रारी दिल्या परंतु आश्वासनावर व्यतिरिक्त ग्रामस्थांच्या वाट्याला निकॄष्ट दर्जाची शौचालयेच आली आहेत वेळीच हे प्रश्न सोडविले नाही तर आंदोलन करण्याची ग्रामस्थ व महिला वर्गात चर्चा सुरू आहे.
सरकार सांगते की,'एक कदम स्वच्छता की ओर' मात्र तमदलगे ग्रामपंचायती याला अपवाद आहे अशा प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया तेथील महिला व नागरिकांच्याकडून मिळत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा