Breaking

रविवार, १८ जुलै, २०२१

जिल्हा प्रशासनाची निर्णय : सोमवार ते शुक्रवार पर्यंत सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सुरू राहणार

 


कोल्हापूर जिल्ह्यातील मागील आठवड्यात  पॉझीटिव्ह रेट ९.७ टक्कयांपर्यंत कमी झाल्याने शनिवारी जिल्हा प्रशासनाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ यावेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

    शासनाच्या निकषानुसार जिल्ह्याचा समावेश आता स्तर ३ मध्ये झाला असून अत्यावश्यक सेवा वगळता गेल्या तीन महिन्याहून अधिक काळ बंद असलेले सगळे व्यवसाय, दुकाने उद्यापासून खुली होणार आहेत, मात्र काही बाबतीत निर्बंध कडक ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आदेशात म्हटले आहे.

      सध्या जिल्ह्यातील संसर्गाची लाट ओसरत असून ८ ते १४ जूलै या आठवड्यातील सरासरी आरटीपीसीआर पॉझीटिव्ह रेट ९.७ टकक्यांवर आला आहे.

    तसेच मागील दोन आठवड्यातील संसर्गांचा विचार करुन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यासाठी सोमवारपासून (दि.१९) स्तर ३ चे निर्बंध लागू करण्याचा तसेच काही बाबींमध्ये निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला.


त्यानुसार जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यत सकाळी ७ ते दुपारी ४ यावेळेत सुरू राहतील व शनिवारी-रविवारी बंद असतील. अत्यावश्यक सेवा रोज वरील वेळेत सुरू असतील.


👉🏼 हे राहील सुरू


अत्यावश्यक सेवेतील दुकाने रोज सकाळी ७ ते ४ यावेळेत.

अत्यावश्यक वगळता अन्य सर्व दुकाने व कार्यालये सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ यावेळेत.

सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, फिरणे, सायकलिंग, खेळ, सर्व दिवशी सकाळी ५ ते ९ पर्यंत.

रेस्टॉरंट सर्व दिवशी फक्त पार्सल व घरपोच सेवा.

चित्रीकरण अलगीकरणाच्या व्यवस्थेसह सर्व दिवशी सकाळी ७ ते ४.

लग्नसमारंभ २५ माणसात, अंत्यविधी २० माणसांत

स्थानिक स्वराज्य तसेच सहकारी संस्थांच्या सभा सभागृहाच्या ५० टक्के क्षमतेसह.

व्यायामशाळा, केशकर्तनालये, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर सर्व दिवशी सकाळी ७ ते ४.


👉🏼 हे बंद राहील


मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह.

कार्यक्रम मेळावे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा