Breaking

शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

दानोळी- कवठेसार येथे आढळली सहा फूट लांबीची मगर. जयसिंगपूरच्या W.C.R.S टीमकडून मगर सुरक्षितपणे रेस्क्यू .

  

W.C.R.S  टीम

      दानोळी- कवठेसार (ता.शिरोळ) रस्त्यादरम्यान जमादार यांच्या विहिरीतुन आज पहाटे (दि.14) रोजी 'वाइल्ड लाईफ कंजर्वेशन रेस्क्यू सोसायटी', जयसिंगपूर (W.C.R.S)  या टीमने सहा फूट मगर (नाईल क्रोकोडाईल) 
रेस्क्यू केली व वनविभागाच्या आदेशाने नैसर्गिक अधिवासात सोडले. पूरपरिस्थिती मुळे ही मगर येथे आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

       काल रात्री साडे अकराच्या सुमारास जमादार यांना विहिरीत मगर दिसून आली, त्यावेळी जमादार यांनी वाइल्डलाइफ कंजर्वेशन रेस्क्यू सोसायटीची संपर्क साधला. विहिरीतून पाणी काढण्याची व्यवस्था केल्यानंतर पहाटे 05:00 च्या सुमारास 6फूट लांब मगर पकडण्यात आली. इंग्लिश मध्ये नाईल क्रोकोडाईल (Nile crocodile) असे म्हणतात.

       वाइल्ड लाईफ कंजर्वेशन रेस्क्यू सोसायटीचे अध्यक्ष सर अभिजीत खामकर, व सदस्य  शुभम रास्ते, साई रसाळ, सचिन सुरवसे,शाहरुख मुजावर, निरंजन यादव, दिलीप कांबळे, राम पडियार, सुमित धोत्रे,दिवाकर तिवडे यांनी ही मगर रेस्क्यू केली. सकाळी पहाटे पाचच्या सुमारास मगर रेस्क्यू करण्यात यश मिळाले. यावेळी वनविभागाचे वन मजूर हरीभाऊ जाधव हे उपस्थित होते. मगर रेस्क्यू केल्यानंतर वनविभागाच्या आदेशाने लगेचच पहाटे सहाच्या सुमारास त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.

    

1 टिप्पणी: