Breaking

मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१

मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मनमानी कारभाराचे विरोधात कुरुंदवाड गाव बंदला प्रतिसाद



कुरुंदवाड प्रतिनिधी : प्रा.अमोल सुंके


       कुरुंदवाड शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे,रस्ता दाखवा व बक्षीस जिंका अशी अवस्था झाली आहे तरी सर्व रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी कुरुंदवाड शहर बचाव कृती समितीने केलेल्या वळकटी आंदोलनाचे निवेदन मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी स्विकारले नाही. याउलट त्यांनी पोलीस बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला या निषेधार्थ आज मंगळवारी शहर बचाव कृती समितीच्या वतीने कुरुंदवाड बंदची हाक देण्यात आली होती.व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून आवाहनाला प्रतिसाद दिला.


       आंदोलकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून पुष्पहार अर्पण करून शहरातील मुख्य चौकातून नवबाग रस्ता, सन्मित्र चौक ते नगरपालिका चौकापर्यंत मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत मोर्चा काढण्यात आला.

   यावेळी राजू आवळे म्हणाले, पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व काँग्रेसचे युवा नेते यांनी शहराची पाणीपुरवठा योजना,अतिक्रमण नियमितकरण, स्वच्छता, घरफाळा वाढ व शहरातील रस्त्यांची झालेली चाळण यासह आदी विषयांच्या बाबतीत बग्याची भूमिका घेतली आहे.त्यामुळे शहराची अधोगती झाली आहे. याबाबत आम्ही वरचेवर आंदोलने केली.मात्र प्रत्येकवेळी पोलीस बळाचा वापर करून आमचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.आम्ही आंदोलने स्टंटबाजी साठी करत असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र आम्ही गावच्या विकासासाठी लढत आहोत.आम्हाला खुर्ची नको मात्र गावचा विकास करा लोकांची फसवणूक करू नका असे यावेळी इशारा देण्यात आला 

      यावेळी सुनील कुरुंदवाडे,अभय पाटुकले, बबलू पवार, आदींनी जोरदार भाषणे केली.

      यावेळ सिकंदर सारवान, आर्षद बागवान, बंडू उमडाळे, योगेश जीवााजेे,विलास उगळे, अण्णासो चौगुले, राजू घारे, महावीर आवळे, सुरेश कांबळे, रियाज शेख आदी सहभागी झाले.

  नगरपालिका प्रशासनाविरोधात नागरिकांच्या मध्ये खूप मोठा रोष असल्यामुळे नागरिकांनी अप्रत्यक्षपणे प्रतिसाद दिला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा