प्रविणकुमार माने : उपसंपादक
जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथे गुन्हे शोध पथकाने दरोडय़ाच्या प्रयत्नाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक केली.
याबाबत अधिक माहीती अशी की, दि.12/07/2021 रोजी रात्री 1 वाजणेच्या सुमारास संशयित दोन आरोपीनी फिर्यादी रहात असले संतोष सदाशिव भाईंगडे रा.साखळे मळा, आंबेडकर सोसायटीजवळ, जयसिंगपूर यांचे राहते घरातील खोलीच्या खिडकीची काच फोडून त्यातून लोखंडी राॅड घालून राॅडद्वारे खिडकीजवळ अडकवलेली पर्स काढून घेणेचा प्रयत्न केला तसेच इतर आरोपींनी खोलीचा दरवाजा उघडून चोरी करणेच्या उद्देशाने आत प्रवेश करून खिडकीची काच फोडून नुकसान केलेली आहे. फिर्यादीना घटनास्थळी मिळालेला मोबाईल पोलीसांकडून पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे.
जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक वाघ,पोसई पाटील, पोलीस काॅ.डावाळे, मुजावर , अवघडे ,भोसले व चालक सहा.फौजदार देशमुख,बने , सनदी, भातमारे, पठाण आणि सुर्यवंशी यांनी आरोपीचे राहते घरी जाऊन त्यांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्या आरोपींनी गुन्हयाची कबूली दिलेली आहे.
1)अक्षय सदाशिव प्रधान रा.सनबलीपाशी राज्य ओडीशा 2)अनिल मुंडा रा.बिजादिही राज्य ओडीशा 3)महेश निसान रा.बोबडीयाडी राज्य ओडीशा 4)राहूल हुमले रा.जगदलपूर राज्य छत्तीसगड अशी दि 12/08/2021 रोजी 22.15 वाजता अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच 5) शिवराम बगेल रा संतोषी या आरोपीस 23/08/2021 रोजी 12.33 वा सुमारास अटक करण्यात आली आहे.
वर नमूद आरोपींनी दरोडा टाकणेचा प्रयत्न केला आहे.सदर आरोपींना मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टात हजर केले असता सहा. सरकारी अभियोक्ता मिरजे साहेबांनी सरकार पक्षाच्यावतीने जोरदार युक्तीवाद करून आरोपींना पोलीस कस्टडी देणेची विनंतीवरून सदर आरोपींना मा.कोर्टाने चार दिवस पी.सी.दिलेली आहे.सदर गुन्हाचा तपास हा मा.पोलीस.निरीक्षक.डी.एस.बोरीगिड्डेयांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.
सदर घटनेमुळे जयसिंगपूरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना जयसिंगपूर पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळून अल्पकाळात केलेली कामगिरी कौतुकास्पद असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा