Breaking

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

*कोल्हापूर : वरदचा नरबळी की...खून?*



हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी


सोनाळी (ता. कागल) येथील सात वर्षांचा निष्पाप बालक वरदचा नरबळी की, खून? अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून तपास यंत्रणा गतिमान करण्याची गरज आहे.17 ऑगस्ट रोजी वरदचा त्याच्या वडिलांच्या मित्राकडूनच खून झाला. या खुनाची कबुलीही आरोपी दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य (वय 44, रा. सोनाळी) याने पोलिसांसमोर दिली आहे; पण हा खून कोणत्या कारणाने झाला? याची संभ्रमावस्था तयार होताच आरोपीने आपल्याला अपत्यप्राप्‍ती व्हावी, या उद्देशाने वरदचा नरबळी दिल्याची चर्चा सुरू आहे; पण पोलिसांना याचे कोणतेच धागेदोरे सापडत नाहीत. त्यामुळे खून कोणत्या कारणाने झाला? हे शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा