Breaking

रविवार, १९ सप्टेंबर, २०२१

*कोल्हापुरात येण्याआधीच किरीट सोमय्या यांना होणार अटक?*


सौजन्य : झी 24 तास


हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी


     माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या निवास्थानाच्या परिसरात पोलिस फौजफाटा तैनात केल्याचे समोर आले आहे. तसेच कोल्हापुरात न येण्याचे सोमय्या यांना आदेश देण्यात आला आहे. ही नोटीस कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्या नावे असल्याची सूत्रांकडून समजते आहे.

दरम्यान, नोटीस घेऊन पोलिस अटक करण्यासाठी सोमय्या यांच्या घरी हजर झाल्याचे समजते आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना सोमय्यांनी घणाघाती टीका केली आहे.

सोमय्या म्हणाले की, ‘घोटाळेबाज सरकराने राज्याची वाट लावली आहे. हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी मला अटक करण्याचा आदेश देण्यात आला आहे. माझं कितीही तोंड दाबले तरी मी मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढणार आहे, असे संतप्त मत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा