Breaking

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

*आगर येथे भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर पाच जखमी*



आगर रस्त्याजवळ अपघात


प्रविणकुमार माने : उपसंपादक


   मौजे आगर ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथे एका ईसमाने निष्काळजीपणे वाहन चालविलेने सदर वाहनाचा आकस्मिक अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर वाहनातील पाच जण गंभीर जखमी झालेले आहेत.

      याबाबत अधिक माहीती अशी की,दि.18/09/2021 रोजी 22.30 वाजणेच्या सुमारास डाॅ.जे.जे.मगदूम काॅलेजजवळ, शिरोळ रोडवर, आगर गावाच्या हद्दीत आरोपी रमेश बसाप्पा हिटनाळे रा.गल्ली नं 7,राजीव गांधीनगर, जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर याने त्याच्या ताब्यातील टेम्पो क्र.MH09 EM.2280 हे वाहन भरधाव वेगाने, हयगयीने, निष्काळजीपणे चालविलेने त्याचा टेम्पोवरील ताबा सुटलेने तो टेम्पो पलटी होऊन अपघात केलेने टेम्पोत बसलेले सिद्धू लिंगापा पिडाई रा.7वी गल्ली, राजीव गांधीनगर, जयसिंगपूर यांचे डोकीस गंभीर दुखापत होऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबाबतची फिर्याद सूर्यकांत यलापा मुडलगी रा.6 वी गल्ली, राजीव गांधीनगर, जयसिंगपूर यांनी दिलेने सदर फिर्यादीवरून म.पो.काॅ.गायकवाड मॅडम यांनी आरोपीचेविरूदध गुन्हा दाखल केलेला आहे.सदर अपघातात 1)सुमित बडबडे, 2)वरद मगदूम ,3)आशफाक शेख,4)सद्दाम पठाण, 5)आरोपी हिटनाळे हे सर्वजण गंभीर जखमी झालेले आहेत.

      सदर अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झालेले असून ते वाहन पोलीसांनी जप्त केले आहे.सदर गुन्ह्याचा संपूर्ण तपास पो.हे.काॅ.सरनाईक  करीत आहेत. सदर अपघातामुळे बघ्यांची गर्दी होऊन वाहतूकीची कोंडी झाली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा