Breaking

सोमवार, २० सप्टेंबर, २०२१

इचलकरंजीमध्ये आर्म ॲक्ट नुसार दोघा तरुणांना अटक

 


मालोजीराव माने : कार्यकारी संपादक


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहर व परिसरात पोलीस प्रशासनाने अत्यंत प्रामाणिक कर्तव्य बजावत आपलं कार्य सुरु ठेवलेलं आहे. परंतु आज एका गणेश मंडळा समोरच तलवारीचे वार दोघा तरुणांनी केले आहे.

    प्राप्त झालेल्या माहितीनुसार, इचलकरंजी येथील बरगे मळा परिसरातील एका गणेश मंडळासमोर किरकोळ कारणावरुन तलवार काढून वार करण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली.     

       निखिल जंबा पाटील (वय 20 रा. कबनूर) व श्री लोखंडे (वय 20 रा. स्वामी मळा) अशी त्यांची नांवे आहेत. त्यांच्याकडून तलवार जप्त करुन आर्म अ‍ॅक्टनुसार शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा