मा.दत्तात्रय बोरीगिड्डे,पोलीस निरीक्षक, शिरोळ |
हिना मुल्ला : विशेष प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ शिरोळच्या हृदयरोग तपासणी शिबीरास प्रतिसाद
शिरोळ : सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य यासह विविध उपक्रमात रोटरीने नेहमीच पुढाकार घेतला आहे. जागतिक हृदय दिनानिमित्त हृदय रोग तपासणी शिबीरचा उपक्रम कौतुकास्पद आहे. रोटरी क्लब आॅफ शिरोळच्या अशा प्रत्येक उपक्रमाच्या पाठीशी राहू, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी केले.
जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून येथील रोटरी क्लब आॅफ शिरोळ आणि अथायु हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी कल्लेश्वर मंदिर सभागृहात मोफत हृदयविकार तपासणी शिबीर पार पडले. या शिबीरास शहरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शुगर तपासणी, ब्लड प्रेशर त्याचबरोबर ईसीजी तपासणी करण्यात आली. प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष दिपक ढवळे यांनी स्वागत करुन रोटरीच्या उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी रोटरीचे असिस्टंट गर्व्हनर रुस्तम मुजावर, डॉ. राहूल चौगुले, डॉ. अंगराज माने, अविनाश टारे, नितीन शेट्टी, प्रविण कनवाडे, धैर्यशील पाटील, अतुल टारे, युवराज जाधव, शरद चुडमुंगे, संदीप बावचे यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते. सचिव सचिन देशमुख यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा