![]() |
अवनी लेखरा |
टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखरा हिने एकाच स्पर्धेत वैयक्तिक दुसरे पदक जिंकत इतिहास रचला आहे. ५० मीटर रायफल ३ पोझिशन एसएच१ स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळवलं. अंतिम फेरीत ४४५.९ गुणांसह ती तिसऱ्या स्थानावर राहिली. या स्पर्धेत चीनची झांग क्यूपिंग (४५७.९) आणि जर्मनीची हिलट्रॉप नताशा (४५७.१) या गुणांसह अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरल्या. याआधी सोमवारी अवनी लेखरा हिने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात बारावं पदक आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेमबाज अभिनव बिंद्रा यांनी अवनी लेखराच्या कामगिरीचं कौतूक करत ट्वीट केलं आहे.
Tokyo Paralympics, R8 Women's 50m Rifle 3P SH1: Avani Lekhara wins bronze medal
— ANI (@ANI) September 3, 2021
(file photo) pic.twitter.com/IeTAe6exKg
भारताला या स्पर्धेत २ सुवर्ण, ६ रौप्य आणि ४ कांस्य पदक मिळाली आहे. हे भारताच्या पॅरालिम्पिक इतिहासातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. रियो पॅरालिम्पिक (२०१६) स्पर्धेत भारताने २ सुवर्ण पदकांसह ४ पदकं जिंकली होती.
हेही वाचा...
भारतात VPN बंदी झाल्यास 'वर्क फ्रॉम होम' कर्मचाऱ्यांवर येणार मर्यादा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा