![]() |
संग्रहित |
देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने ई- श्रम पोर्टल सुरु केलं आहे. कोरोना काळात असंघटित क्षेत्रातील कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्यामुळे भविष्यात त्यांना अशा प्रकारे पुन्हा अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे. 26 ऑगस्टपासून या पोर्टलवर नोंदणी सुरू झालेली आहे.
ई-श्रम ( E-Shram) पोर्टलवर बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरिल विक्रेते, घरगुती कामगार, दूधवाला, ट्रक चालक, मच्छीमार, कृषी कामगार आदि असंघटित कामगारांचा समावेश असेल.
अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाखांचा विमा
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास केंद्र सरकारकडून त्यांच्या वारसांना दोन लाख रुपयांच्या विम्याचे कवच देण्यात येणार आहे. तसेच अपघातात कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी आपले ओळखपत्र, आधार कार्ड, बँक खाते पासबूक किंवा बॅंक डिटेल, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो असणं अनिवार्य आहे. तसेच मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असायला हवा.
Thanks for useful information
उत्तर द्याहटवा